labours
labours 
विदर्भ

'ए भाऊ चल रोजगार हमी योजनेच्या कामावर.. कोरोना'ने सर्वांना आणले जवळ

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : एकेकाळी मजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि खऱ्या अर्थाने ज्यांना कामाची गरज आहे, अशी तरुण मुले-मुली रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होती. मात्र, यंदा हे चित्र कोरोनारूपी संकटाने बदलून टाकले आहे. आपल्या प्रतिष्ठेखातर रोजगार हमी योजनेच्या कामावर कधीही न जाणारी व्यक्ती आज, केवळ पोटाची भूक भागविण्यासाठी जात आहेत. जिल्ह्यातील हे चित्र खरोखरच वेदनादायी तितकेच मनाला पाझर फोडणारे आहे.

'कोरोना' या जीवघेण्या विषाणूने सुमारे तीन महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात पाय रोवले. 26 मार्च ही तारीख कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण घेऊन उजाडली. त्यानंतर सव्वा ते दीड महिने परिस्थिती साधारण असताना जिल्हा प्रशासनाने सर्व आस्थापना, दुकाने यांच्यावरील निर्बंध बहुतांश प्रमाणात शिथिल केले. आपली दुकानदारी पूर्ववत सुरू होणार, अशा हळव्या आशेने प्रत्येक दुकानदार, लघुउद्योगजक होता. मात्र, त्यांची ही आशा, त्यांचे उद्याचे स्वप्न क्षणात धुळीस मिळाले. 

लघुउद्योजकांचा सर्वाधिक समावेश
पुन्हा काही दिवसांपूर्वीच कोरोनारूपी संकटाने जिल्हाभरात आपले पाय घट्ट केले. त्यामुळे प्रशासनाला नियमांत कठोरता आणावी लागली. गर्दी होणारी दुकाने, एकमेकांच्या संपर्कात येणारे नाव्ही, बांधकाम व्यावसायिक, चहा, पान, खर्रा टपरीचालक, रिक्षाचालक यांना तुकडाभर भाकरीची किंबहुना वीतभर पोटाची चिंता वाटू लागली. अनेकांनी अत्यावश्यक सेवेत येणारी आणि नगदी पैसा देणारी दुकानदारी पसंत केली. मात्र, ही दुकानदारी नवीन असल्याने बहुतांश जणांच्या पथ्याला पडली नाही. परिणामी, नव्याने उजाडणारा आणि पोटाची भूक घेऊन येणारा दिवस स्वस्थ बसू देईना! त्यामुळे इच्छा नसताना हेच लघुउद्योगजक, नाव्ही, बांधकाम व्यावसायिक रोजगार हमी योजनेच्या कामावर पोटाची खळगी भरण्यासाठी जात आहेत

उल्लेखनीय म्हणजे, मजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि खऱ्या अर्थाने ज्यांना कामाची नितांत गरज आहे, अशी तरुण मुले- मुली, त्यांची कुटुंबे यांच्याभोवतीच रोजगार हमी योजना मर्यादित असल्याचे एकेकाळी बोलले जात होते नव्हे, तशी समाजात मानसिकताही तयार झाली होती. मात्र, 'कोरोना विषाणू'रुपी संकटाने समाजाची ही मानसिकता बदलून टाकली आहे. सगळ्यांना एका सूत्रात बांधले आहे. आपण रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलो तर, लोक आपल्यावर टीका करतील, आपल्या प्रतिष्ठेचे हसे होईल, असा एकंदरीत समज अजघडीच्या परिस्थितीवरून लयास गेल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT